जवानांना मरण्यासाठी सोडू शकत नाही - बिपीन रावत
नवी दिल्ली, दि. 29 - लोक दगड आणि पेट्रोलबॉम्ब फेकत असतील तर मी हे सर्व पाहत राहून जवानांना मरण्यासाठी सोडू शकत नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज स्पष्ट केले. काश्मीर मुद्द्यावर ठोस उपायाची गरज असून यामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. दगडफेक करणार्यांपासून वाचण्यासाठी लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला बांधून त्याची मानवी ढाल करण्याचे त्यांनी समर्थन केले. सैनिकांना काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी नव्या पद्धती शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आपल्या तरूण जवानांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. हे जवान अत्यंत बिकट परिस्थितीत दहशतवादग्रस्त भागात सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठीच मेजर लीतुल गोगाई यांचा सन्मान करण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.