लष्कर भरतीसाठी काश्मीरमधील 800 तरूणांनी दिली परिक्षा
श्रीनगर, दि. 29 - लष्करातील ज्युनिअर कमिशन ऑफिसर व अन्य पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियासाठी तब्बल 800 काश्मिरी तरूणांनी संयुक्त प्रवेश परिक्षा दिली. सबजार भट्टच्या मृत्यूनंतर काश्मिरी फुटीरतावाद्यांकडून रविवार व सोमवारी बंद पाळला जात आहे. मात्र, अशातही तरूणांनी लष्करी परिक्षेत एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग दर्शवल्याने ते फुटीरतावादी व दहशतवाद्यांना चोख उत्तर ठरले आहे.
याबाबत बोलताना एका लष्करी अधिका-याने सांगितले की, फुटीरतावाद्यांच्या बंदच्या आवाहनाची पर्वा न करता 799 तरूण श्रीनगर व पट्टनमध्ये झालेल्या परिक्षेला बसले. 815 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांनी केवळ शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी दिली मात्र लेखी परिक्षा दिली नाही.
हिज्बुल कमांडरच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथील काही भागात शासनाने संचारबंदीसारखे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. श्रीनगरमधील नौहट्टा, रेनवाडी, खानयार, एम.आर.गंज, सफा कदल, क्रालखड व मैसूमा या भागात संचारबंदीसारखे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. तरीही तरूणांनी परिक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. उत्तर काश्मीरमधील गांदरबल, बडगाव, बांदीपोरा व कुपवाडामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, कुलगाम, पुलवामा व शोपियामधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.