Breaking News

आयान फारूक शेख राज्यात सातवा

अहमदनगर, दि. 30 - नॅशनल स्कॉलर सर्च परिक्षेत जामखेडचा इयत्ता सहावीतील आयान फारूक शेख हा राज्यात सातवा आला आहे. 
आयान शेख हा शहरातील नामवंत वैद्यकिय व्यावसायिक डॉ फारूक शेख यांचा मुलगा असुन , शहरातीलच किडस इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये शिकत आहे. त्याने नुकतीच इयत्ता सहावीची परिक्षा दिली आहे.  आयान शेख याने अन्य परिक्षामध्येही यश मिळविले आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्हा गणित आध्यापक मंडळाने घेतलेल्या जिल्हास्तरीय गणित प्रज्ञाशोध परिक्षेत जामखेड तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तेरावा आला आहे. तर मंथन परिक्षेत जिल्ह्यात तेवीसावा व राज्यात सदोतीसावा आला आहे. या यशाबद्दल आयान शेख याचे सर्वत्र कौतुक होत आहे.