अफगाणिस्तानातील बॅकेवर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आठ ठार
काबूल, दि. 22 - अफगाणिस्तानातील गार्देज शहरातील न्यु काबूल बॅकेच्या एका स्थानिक शाखेजवळ करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आठ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलीस अधिकारी आणि चार दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एका हल्लेखोराने बँकेजवळ स्फोट घडविला तर अन्य तीन जणांनी बँकेमध्ये प्रवेश करत सुरक्षा दलासह चकमक सुरु केली. गार्देड शहरातील शासकीय रुग्णालयात आठ मृतदेह आणि 31 जण जखमींना दाखल करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागचे प्रमुख शीर मोहम्मद यांना सांगितले.
गेल्या चार दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये करण्यात आलेला हा दुसरा हल्ला असून या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. बँकेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयाकडून ट्वीटरद्वारे निषेध करण्यात आला आहे.