काश्मीरमधील चकमकीत चार दहशतवादी ठार, चार जवानही शहीद
श्रीनगर, दि. 22 - काश्मीर खो-यातील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू असून त्यात चकमकीत चार दहशतवादी ठार झाले असून चार जवानही शहीद झाले आहेत. शस्त्रधारी दहशतवाद्यांचा समूह उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात होता.
याबाबतची माहिती मिळताच लष्कराकडून कारवाई करण्यात आली. त्या कारवाईस उत्तर देताना दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. लष्कराच्या या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. ही चकमक अजूनही सुरू आहे.