शिराळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
सांगली, दि. 27 - शिराळा नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 11 जागा जिंकून या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा रोवला. आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला सहा जागा मिळाल्या, तर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
शिराळा नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी बुधवारी मोठ्या उत्साह व चुरशीने 87.51 टक्के इतके मतदान झाले होते. या 17 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रत्येकी 17, तर भाजपचे 16 व सहा अपक्ष निवडणूक रिंगणात होते. एकूण दहा हजार 513 पैकी नऊ हजार 200 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. पहिल्यांदाच होत असलेल्या या नगरपंचायतीची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजप या तीनही राजकीय पक्षांनी कमालीची प्रतिष्ठेची केली होती. यापूर्वीची प्रत्येक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी करून लढवली होती. मात्र ही निवडणूक या दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी स्वबळावरच लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अभूतपूर्व यश मिळविले. या निवडणुकीवर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात निवडणूक निरीक्षक संजय चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव व तहसिलदार दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रियेस सुरूवात झाली. पहिल्या फेरीत एक, तीन, पाच, सात, 11, 13, 15 व 17, तर दुसर्या फेरीत दोन, चार, सहा, आठ, दहा, 12, 14 व 16 या प्रभागाची मतमोजणी करण्यात आली. ही मतमोजणी प्रक्रिया 24 वरिष्ठ अधिकारी व 36 कर्मचारी यांनी पार पाडली. ही मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस उपअधिक्षक किशोर काळे व शिराळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या निवडणुकीत सर्वप्रथम प्रभाग क्रमांक एकचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपच्या उत्तम डांगे यांनी विजयाची सलामी दिली. प्रभाग निहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक एक- उत्तम हिंदुराव डांगे (भाजप)- 179 मते, प्रभाग क्रमांक दोन- अभिजित विजयसिंह नाईक (भाजप)- 318 मते , प्रभाग क्रमांक तीन- संजय काशिनाथ हिरवडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) 201 मते, प्रभाग क्रमांक चार- श्रीमती राजश्री सचिन यादव (भाजप)- 199 मते, प्रभाग क्रमांक पाच- श्रीमती सुनिता चंद्रकांत कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)- 296 मते, प्रभाग क्रमांक सहा- श्रीमती सीमा प्रदीप कदम (भाजप)- 348 मते, प्रभाग क्रमांक सात- श्रीमती प्रतिभा बजरंग पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)- 220 मते, प्रभाग क्रमांक आठ- श्रीमती अर्चना बसवेश्वर शेटे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 274 मते, प्रभाग क्रमांक नऊ- श्रीमती सुनंदा गजानन सोनटक्के (राष्ट्रवादी काँग्रेस)- 267 मते, प्रभाग क्रमांक दहा- कीर्तीकुमार वसंतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)- 272, प्रभाग क्रमांक 11- वैभव रमेश गायकवाड (भाजप)- 188 मते, प्रभाग क्रमांक 12- श्रीमती आशाताई लक्ष्मण कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 217 मते, प्रभाग क्रमांक 13- श्रीमती सुजाता महादेव इंगवले (राष्ट्रवादी काँग्रेस)- 218 मते, प्रभाग क्रमांक 14- मोहन आनंदा जिरंगे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 341 मते, प्रभाग क्रमांक 15- श्रीमती नेहा नरेंद्र सूर्यवंशी (भाजप)- 185 मते, प्रभाग क्रमांक 16- विजय रघुनाथ दळवी (राष्ट्रवादी काँग्रेस)- 307 मते व प्रभाग क्रमांक 17- गौतम दत्तात्रय पोटे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 146 मते.