राहुरीजवळ स्कॉर्पिओ-जीप अपघातात आठ ठार
नगर, दि. 27 - नगर जिल्ह्यातील राहुरीजवळ आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ-जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील आठ जण ठार झाल्याची घटना घडली.
अपघातानंतर सहा जण जागीच ठार झाले. तर दोघे जण नगरला रुग्णालयात नेतांना ठार झाले. सर्व मृतांचे वय 25 ते 35 दरम्यान आहे. राहुरी फॅक्टरीवरुन नगरच्या दिशेने भरधाव वेगाने चालले होते. राहुरी जवळ एस्सार पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. मृतांची नावे : नाथा राजेंद्र डमाळे, महेश विष्णू पवार, सुरेश एकनाथ खुळे, अरुण विश्वनाथ थोरात, सतीश चंद्रभान शेळके, सतीश चंद्रसेन गोसावी, वरील सर्व रा. वळण, ता. राहुरी, महेश विलास कोळसे, रा. मानोरी, ता. राहुरी, सचीन पंढरीनाथ ढगे, रा. वरवंडी, सरपंच अशी आहेत.