राष्ट्रपती निवडणुकीत प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसची भिस्त
नवी दिल्ली, दि. 22 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बाजू मजबूत होत असताना काँग्रेसची भिस्त प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर असल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशमधील ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय जनता पक्षाच्या मजबूत झालेल्या मतांशी बरोबरी साधण्यासाठी आणि आपला उमेदवार उभा करून भाजपला टक्कर देण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे मन वळवणे अथवा युती करणे हाच एकमेव पर्याय काँग्रेसकडे आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंधित असलेल्या सर्व खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले तर काँग्रेसप्रणित आघाडीला प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी लागणार आहे. असे झाले तर काँग्रेसप्रणित आघाडीच्या मतांमध्ये 9 ते 12 टक्क्यांची वाढ होईल, असे सांगण्यात आले.