Breaking News

गाडी चालवताना चालकाचा र्हदयविकाराने मृत्यू

जालना, दि. 27 - जालना औरंगाबाद रस्त्यावर बदनापूरजवळ गाडीचालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आणि गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात  झाला यात या चालकाचा मृत्यू झाला गाडीतील प्रवाशी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
क्रूझर वाहनाने आज सकाळी औरंगाबादहून चिखलीला एक कुटुंब क्रुझर वाहनाने एका लग्नासाठी निघाले होते तेंव्हा आज दुपारी बदनापुर जवळ गाडीचे चालक खंडू  तोतमल यांना वाहन चालवताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला जोरदार धडक बसून अपघात झाला. या  अपघातात वाहन चालक खंडू तोतमल यांचा मृत्यू झाला.गाडीतील 9 जणही जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथे  उपचार चालु आहेत.