भाजप जि.प. सदस्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
बीड, दि. 27 - भाजपाचे जिल्हा परिषद सदस्याचे पती असलेल्या राणा डोईफोडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राणा हे बीडमधील विठाई नरसिंग होमचे प्राचार्य असून त्यांच्याविरोधात महाविद्यालयात विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला असून विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या मुळे खळबळ उडाली आहे.
