Breaking News

त्या ऐवजी मला पक्षातून काढून का टाकत नाही- शत्रुघ्न

मुंबई, दि. 27 - पक्षातून काढले जाईल अशी धमकी देण्यापेक्षा मला पक्षातून काढले का नाही जात?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना विचारला आहे. पक्षातून काढण्यात येईल अशी धमकी मी अनेक वर्षांरपासून ऐकत आहे. कृपया मला धमकी देणे यापुढे बंद करा. त्यापेक्षा माझ्यावर कारवाई करून मला पक्षातून काढून टाका, असेही लिन्हा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शत्रुंना पक्षातून बाहेर काढायला हवे. पुढे पुढे करणा-यांमुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान होत आल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रतिभावान नेते आहेत. ते देशाचा विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत, असेही त्यांनी नमूद केले.