Breaking News

पाक घुसखोरीचा कट लष्कराने उधळला; ‘बॅट’चे दोन कमांडो ठार

श्रीनगर, दि. 27 - जम्मूमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमेवर कृती पथकाकडून (बॅट) करण्यात आलेला हल्ला भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत बॅटचे दोन कमांडो ठार झाले. 
मे महिन्याच्या सुरुवातीलाही अशाच प्रकारे गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकच्या कृती पथकाने हल्ला केला होता. यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. त्या पूर्वी पाकिस्तानच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर भारतीय जवानाला मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विटंबना केली होती.
9 मे रोजी भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या . यासंदर्भातील ध्वनीचित्रफीतही भारतीय लष्कराकडून सादर करण्यात आली होती. बर्फ वितळत असल्यामुळे घुसखोरीच्या घटना वाढत आहेत अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. पाकिस्तान लष्कराच्या कारवाया अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचेच आजच्या घटनेतून दिसले आहे.