Breaking News

बेपत्ता सुखोई एसयू 30 चे अवशेष सापडले

नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सयू 30 जेट फायटर विमानाचे अवशेष तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ सापडले आहेत. मंगळवारी विमानाने उड्डाण केल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अवशेष चीनच्या सीमेजवळ सापडले असून विमानामध्ये असलेल्या दोन्ही वैमानिकांची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमान दोन वैमानिकांसह मंगळवारी नियमित सरावासाठी गेल्यानंतर या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली होती.  दोन इंजिन असलेल्या सुखोई -30 जेट फायटरची रचना रशियाच्या सुखोई एव्हिएशन कॉर्पोरेशनने केली आहे. भारताच्या संरक्षणेच्या दृष्टीने सुखोई महत्वाचे आहे.