Breaking News

मॅन्चेस्टर हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्विकारली, हल्ल्यापूर्वीचे ट्विट समोर

लंडन, दि. 24 - मॅन्चेस्टर एरिना येथे झालेल्या स्फोटाची जबाबदारी इसिसने स्विकारली असून या हल्ल्याची माहिती हल्ल्यापूर्वी ट्विटरवरून देण्यात आल्याचे  समोर आले आहे. ब्रिटन तुम्ही आमची धमकी विसरलात का, हाच दहशतवाद आहे, अशा आशयाचे ट्विट या स्फोटाच्या चार तास अगोदर प्रसिद्ध करण्यात आल्याचे  समोर आले आहे. यानंतर असे ट्विट प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्विटर खात्याचा दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाबाबत पडताळणी केली जात आहे. असे ट्विट प्रसिद्ध  झाल्यानंतर हे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे. हा हल्ला म्हणजे इराक व सीरियातील हल्ल्यांचा बदला असल्याचे इसिस समर्थक ट्विटर खातेधारकांनी आपल्या  ट्विटमध्ये म्हटले आहे.
ब्रिटनमधील मॅन्चेस्टर एरिना येथे 22 मे रोजी रात्री पॉप गायक अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान दोन स्फोट झाले. त्यात मरण पावलेल्यांची संख्या आता 22वर  पोहोचली असून जखमींच्या संख्येतही वाढ झाली आहे.