झाकीर नाईकचा आता मलेशियाच्या नागरिकत्वासाठी अर्ज
नवी दिल्ली, दि. 31 - वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकने आता मलेशियाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केल्याचे समजते. यापूर्वी तो मलेशियात राहत असल्याचे सांगितले होते. याशिवाय एप्रिलमध्ये मलेशियामध्ये एका कार्यक्रमात झाकीर नाईकचा सत्कार करण्यात आला होता. असे असले तरी त्याला परत आणण्यासाठीच्या प्रयत्नात बदल होणार नसल्याचे भारतीय अधिका-यांनी सांगितले. यापूर्वी त्याला सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळाल्याचे वृत्त होते. इंटरपोलपासून बचाव करण्यासाठी त्याने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्विकारल्याचे सांगितले जात होते.