Breaking News

पाककडून आर्थिक मदत मिळत असल्याची काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांची कबूली

नवी दिल्ली, दि. 31 - पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळत असल्याची कबूली जम्मू काश्मीरमधील काही फुटीरतावादी नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तपास संस्थेच्या चौकशीत तीन फुटीरतावादी नेत्यांनी आपल्या संघटनेला पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळत असल्याचे मान्य केले आहे.
काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना हुर्रियत कॉन्फरंन्सचे प्रमुख सैय्यद अली गिलानी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. या तीन फुटीरतावाद्यांच्या चौकशीत आणखी काही नवीन गोष्टी समोर येऊ शकतात, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. फुटीरतावाद्यांना पाकिस्तानकडून पुरवण्यात आलेली आर्थिक मदत सौदी अरेबिया, बांगलादेश व श्रीलंकेहून दिल्लीतील हवाला व्यवहार करणार्‍या टोळयांकडून फुटीरतावाद्यांकडे पोहोचवली जाते. त्यानंतर पंजाब व हिमाचल प्रदेशमधील ती काश्मीरमध्ये पाठवली जाते.