कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची अब्दुल बासित यांनी माहिती
नवी दिल्ली, दि. 31 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची माहिती पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय लष्कराने 9 मे रोजी नौसेरामध्ये केलेल्या कारवाईची चित्रफित खोटी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी फेटाळला. पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त करण्यात आलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पाकिस्तानी जवानांकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आलेली नसल्याचेही ते म्हणाले. भारताकडे याबाबतचे पुरावे असल्यास ते सोपवावेत असेही ते म्हणाले.
काश्मीरप्रश्नी पाकिस्तान काश्मीरींना भारताविरुद्ध चिथवत नसल्याचा दावाही त्यांनी केला. या शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बु-हान वानीला हिरो म्हणून काहीही चूक केलेली नसल्याचेही ते म्हणाले.