संपकाळात औषधे उपलब्ध करुन देण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
औरंगाबाद, दि. 27 - औषधी दुकानदारांच्या संघटनेच्या वतीने देशभरात दि. 30 मे 2017 रोजी करण्यात येणा-या संपात औरंगाबाद जिल्ह्यातील औषध दुकानदारांनी सहभागी न होता रुग्णांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.
दि. 30 मे रोजीच्या संपामध्ये औषधी दुकानदारांनी सामील होऊ नये. या दिवशी नियमितपणे औषध दुकाने सुरु ठेवून जनतेची गैरसोय होणार नाही तसेच रुग्णांना त्रास होणार नाही, या समाजपयोगी भावनेतुन औषधे उपलब्ध करुन द्यावी. सरकारी, निमसरकारी व खाजगी दवाखान्यांनी रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने मुबलक औषधसाठा दि. 30 मे पूर्वीच उपलब्ध करुन ठेवावा. या संप काळात जनतेस औषधांचा पुरवठा करण्यास जर औषधी दुकानदारांनी नकार दिला तर त्याबाबत सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाथ सुपर मार्केट, औरंगपूरा, औरंगाबाद, दु.क्र. 0240-2331526 याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद कार्यालय यांनी केले आहे.