सांगलीत 11 जून रोजी राज्यस्तरिय सामाजिक अत्याचार विरोधी परिषद
सांगली, दि. 27 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली जिल्हा दौर्यात विधवा महिलांना मारहाण करणार्या पोलिस अधिका-यांवर कारवाई करावी व विधवा महिलांचे थकित मानधन तातडीने द्यावे, या मागणीसाठी दि. 11 जून रोजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राज्यव्यापी सामाजिक अत्याचार विरोधी परिषद आयोजित केल्याची माहिती शंकर पुजारी यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली जिल्हा दौ-यात त्यांना निवेदन देण्यासाठी मिरज येथील शासकीय विश्रामगृहात गेलेल्या विधवा महिलांना काही पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी फरफटत नेऊन मारहाण करून वाहनात डांबले होते. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगारांच्या कल्याणार्थ खर्च करण्यासाठी सहा हजार कोटी रूपये जमा आहेत. त्यातील केवळ 217 कोटी रूपयेच गत सात वर्षात खर्च झाले आहेत.
उर्वरित निधीच्या खर्चाचे काय? याची विचारणा करण्यासाठीच या विधवा महिला गेल्या होत्या. मात्र त्यांना पोलिस अधिका-यांनी मारहाण करून हुसकावून लावले. या विधवा महिलांवर अत्याचार करणा-या पोलिस अधिका-यांवर तातडीने कारवाई करावी, ही आमची प्रमुख मागणी असून याशिवाय सांगली जिल्ह्यातील अर्ज केलेल्या सर्व बांधकाम कामगारांना घोषित लाभ देण्यात यावा, यासाठी या सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेचे आयोजन केल्याचे शंकर पुजारी यांनी सांगितले.