Breaking News

दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांक मालिका सुरु

औरंगाबाद, दि. 27 - परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम एच 20 ई क्यू 1 ते 9999 ही मालिका दिनांक 29 मे, 2017 पासुन सुरु करण्यात येणार आहे. ज्या  वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल, त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्ज सदरील आकर्षक क्रमांकाला लागून असलेली फी च्या रकमेचा  प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद यांच्या नावाचा धनाकर्ष (डी.डी.) व आपल्या ओळखपत्राच्या साक्षांकीत प्रतीसह दिनांक 29 मे, 2017 रोजी दुपारी 2पर्यंत  कार्यालयात जमा करावा.
या मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी  अनेक अर्जदारांनी अर्ज केल्यास त्यासाठी विहीत पध्दतीने लिलावाची प्रक्रीया अवलंबिण्यात येईल असे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.