आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजी करणा-या सात जणांना अटक
नवी दिल्ली, दि. 22 - इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये शुक्रवारी खेळण्यात आलेल्या उपांत्य सामन्यादरम्यान ऑनलाईन सट्टेबाजी करणा-या सात जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील अशोक विहारमधील एका रेस्टॉरंट-बारमध्ये या सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच घटनास्थळी धाव घेत सहा सट्टेबाज आणि बारच्या व्यवस्थापकांना अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद महादेव दुंबेरे यांनी ही माहिती सांगितली .
पोलिसांनी यावेळी 8 मोबाईल फोन, टीव्ही, डीव्हीआर जप्त केला आहे. अनुज शर्मा,शाहिल गुप्ता, संचित, ऋषल, अशुतोष, सुशांत आणि बार व्यवस्थापक नरेंद्र अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी यावेळी 8 मोबाईल फोन, टीव्ही, डीव्हीआर जप्त केला आहे. अनुज शर्मा,शाहिल गुप्ता, संचित, ऋषल, अशुतोष, सुशांत आणि बार व्यवस्थापक नरेंद्र अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.