खा़.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शेतकर्यासांठी कार्यक्रम
लातूर, दि. 22 - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शेतकर्यांसाठी ‘उमेदङ्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवा महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण, आरोग्यासाठी सहाय्य करण्यात येणार असून खा़.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हॉटेल मयुरा येथे हा कार्यक्रम होईल़ लातूर जिल्ह्यातील 25 आणि मराठवाड्यातील 200 विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन या संस्थेचे आहे.