Breaking News

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली, दि. 22 - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आज दिल्लीतील वीरभूमी या त्यांच्या समाधीस्थळी काँग्रेसच्या अध्यक्षा  सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वडेरा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरूमबुदुर येथे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना गांधी यांची हत्या  करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येमागे श्रीलंकामधील दहशतवादी संघटनेचा हात होता.