Breaking News

पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौ-यापूर्वी हार्दिक पटेलसह 50 तरूणांनी केले मुंडन

नवी दिल्ली, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौ-याआधीच पाटीदार नेता हार्दिक पटेल याने आपल्या समुदायातील 50  तरूणांसह आज मुंडन केले. पाटीदार समाजाच्या तरूणांची दोन दिवसीय न्याय यात्रा लाथिडाल येथून सुरू होणार असून  (सोमवार) भावनगरमध्ये संपणार आहे.  या दोन दिवसीय न्याय यात्रेदरम्यान 51 गावांना भेट देणार आहेत.
2015 मध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात न्याय यात्रा सुरू करण्यात आली आहे. यात 13 तरूण ठार झाले होते. बोताड येथून या यात्रेला प्रारंभ करणार  आहे, अशी माहिती हार्दिक पटेलने दिली.