बारावीचा निकाल 31 मेच्या आत
पुणे, दि. 27 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी (दि.29) जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. त्यामुळे बारावीचा निकाल 30 किंवा 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य शिक्षण मंडळामार्फत बारावीची लेखी परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा बारावीची परीक्षा महापालिका निवडणुकांमुळे आठ दिवस उशिराने सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला होता. यंदा हा निकाल त्याहून चार-पाच दिवस लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे.
मंडळाने सर्व विभागाकडून निकाल संकलित केले असून, निकालाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यासंदर्भात म्हमाणे यांनी आज दोन वेळा निकालाचा आढावा घेतला. शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी निकालाचा अंतिम आढावा घेऊन, त्याच दिवशी सायंकाळपर्यंत निकालाची तारीख प्रसिद्ध केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारावीचा निकाल दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदाही मे महिन्याच्या आतच निकाल लागण्यासाठी मंडळाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. जूनच्या एक तारखेला निकाल जाहीर केला, तर त्याचा परिणाम बोर्डाच्या अधिकार्यांवर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल 31 मे महिन्याचा आत लावायचा, यादृष्टीने बोर्डाने तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.