उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी स्विकारला पदभार
संगमनेर, दि. 29 - उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांची नुकतीच नाशिक येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर अशोक थोरात यांनी शनिवारी पदभार स्विकारला. संगमनेर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. या गुन्हेगारीला कसे सामोरे थारात कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संगमनेर तालुका तसा संवेदनशिल म्हणून ओळखला जात होता. मात्र कालांतराने या तालुक्यात बरेच बदल होत गेले. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व इतर क्षेत्रात या तालुक्याने गरुड झेप घेतली आहे. या तालुक्याकडे बघण्याचा दृष्टीकोन राज्यात बदलला आहे. एैतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्याने विकास कामात कात टाकली आहे. मात्र या तालुक्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने विळखा घातला आहे. वाळू तस्करी, अवैध वाहतूक, छुप्या पध्दतीने मटका, दारु व गुटख्यांची विक्री, चोर्या, हाणामार्या, दरोडे आदी गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या संगमनेर तालुका मोठा आहे. वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या भागात चार पोलीस ठाण्यांची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र त्या मानाने पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पोलीस बळावर कामाचा ताण वाढलेला दिसतो.
दरम्यान नव्याने रुजु झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात हे येथील परिस्थिती कशी हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तालुकयात पोफावत चालेली गुन्हेकारी, कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न, अवैध धंदे असे एक ना अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे नव्याने रुजु झालेले उपविभागीय अधिकारी अशोक थोरात हे तालुक्याच्या गुन्हेगारीला कसे मोडीत काढतात याकडे सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष आहे.