Breaking News

सपूर्ण गाव जिर्णोध्दासाठी एकवटले, अवघ्या एका तासात अडीच लाख जमा


पेशवेकालीन गणेश मंदिर जिर्णोध्दाराचा तरुणानी घेतला ध्यास

संगमनेर, दि. 29 - तालुक्यातील ऐतिहासिक व सास्कृंतीक वारसा लाभलेल्या आश्‍वी येथील पुरातन पेशवेकालीन गणेश मंदिराचा मागील अनेक वर्षापासून जिर्णोध्दार रखडला होता. त्यामुळे आश्‍वी खुर्द येथील तरुणानी एकत्र येत गणेश मंदिरात शपथ घेत जिर्णोध्दाराचा संकल्प केला.
पेशवाईचे अधिराज्य असताना ऐतिहासिक आश्‍वी या गावाला त्याकाळी अतिशय महत्व असल्याने अमृतवाहिनी प्रवरा नदी तिरावर पेशव्यानी मोठा घाट बांधला होता. तर या ठिकाणी घोडे (अश्‍व) बाधंण्याची व्यवस्था केली होती. येथे घोड्याच्या पागा असल्यामुळेच या गावाला आश्‍वी हे नाव पडले आहे. या ठिकाणी प्रवरानदीवर दळणवळणासाठी आवश्यक पूल व स्मशानभूमी झाल्यामुळे काळाच्या ओघात येथील घाट हा जमिनीखाली दाबला गेला. पेशवे ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणी ते गणेश मंदिराची उभारणी करत होते. आश्‍वी येथेही असे मंदिर होते. परंतू काळाच्या ओघात मंदिराची दुरावस्थां झाल्याने सध्या ते भग्न अवस्थेत आहे.
त्यामुळे काही वर्षापूर्वी इतिहासाची साक्ष असलेल्या या गणेश मंदिराच्या जिर्णोध्दाराचा निर्णय येथील ग्रामंस्थानी घेतला.  मंदिराचे काम ही सुरु झाले होते. देणगी अभावी मंदिराचे कळसाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. देणगी उपलब्ध नसल्याने मागील तीन वर्षापासून जिर्णोध्दाराचे काम बंद होते. या कामासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांकडून मंदिराकडे पाहून खेद व्यक्तं केला जात होता. जिर्णोध्दाराचे काम प्रयत्न करुनही सुरु होत नसल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. अखेर गावातील तरुणांनी पुढाकार घेवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून  गणेश मंदिर जिर्णोधाराचे काम हाती घ्यावे  हा संदेश दिला. याला सर्वच तरुणानी पाठीबा देत, गणेश मंदिर उभारणीसाठी बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीत चर्चाअती अवघ्या एका तासात अडीच लाख रुपये देणगी जमा झाली. तर गावातील जे तरुण नोकरी, व्यसायानिमीत्त गावात व बाहेरगावी आहेत त्या सर्वाना देणगी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.      यावेळी गणेश मंदिराचा कळस, रंगकाम, विद्युत रोषणाई, पेव्हिगं ब्लॉक सभामंडप, पाण्याची टाकी आदि कामे करण्याचा निर्णय घेऊन काम सुरु करण्यात आले. तरुणाचा उत्साह दिसल्याने ग्रामंस्थानीं सहकार्याची भुमिंका घेतली आहे सध्या तत्कालिन जि.प. सदस्या सौ कांचनताई राजेंद्र मांढरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदे अंतर्गत तिर्थक्षेत्र विकास निधीतुन 3 लाख रुपये मंजुर होऊन ते कामही सुरु झाले. या कामात मंदिरापुढे सभामंंडप व पेव्हीगं ब्लॉक बसविले जात आहे. सध्या गावातील सर्व जाती-धर्मातील तरुण एकत्र ऐऊन श्रमदान करत असल्याने काम जोमाने सुरु असून यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.