Breaking News

अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांची किमया अपंगांसाठी स्टेअरींगविरहीत गाडी

संगमनेर, दि. 29 - अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच नवनविन प्रयोग करुन समाजोपयोगी संशोधन करीत असतात. चतुर्थ वर्षात शिक्षण घेणार्‍या चरणयोतसिंह पंजाबी, तुषार डागळे, वैशाली सस्कर, मोनिका शिंदे या विद्यार्थींनींनी अपंग (हाताने अधु) असणार्‍या व्यक्तींसाठी स्टेअरींग विरहीत गाडी बनविली आहे.
पायानेच गाडी चालू करुन स्टिअरींग, अ‍ॅक्सेलेटर, ब्रेक आणि इन्डीकेटर या गाडीमध्ये अशा प्रकारे बसविण्यात आले आहे कि, हाताने अधु असणारी कोणतीही व्यक्ती सहजतेने कितीही ट्राफिकमध्ये गाडी चालवू शकते. पर्यावरण इंधन बचत आणि डिझाईन या सर्व गोष्टींचा विचार ही गाडी बनवितांना करण्यात आला आहे. वेगवेगळ्या रस्त्यांवर ही गाडी चालविली असता ताशी 25 कि.मी चे अव्हरेज मिळाले. बाकीच्या गाड्यांपेक्षा या गाडीला कमी खर्च आला आहे. सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमांनंतर ही गाडी बनविली असून या गाडीचे वजनही कमी करण्मात आले आहे. या प्रोजेक्टसाठी प्रा. विलास शिंदे, व प्रा. एन. एस. खेमनर यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रोजेक्टसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रोडक्शन विभागप्रमुख डॉ. बी. आर. बोरकर, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे यांनी प्रोत्साहन दिल्याने या विद्यार्थ्यांना प्रवरा महाविद्यालयात, के. के. वाघ महाविद्यालयात प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच पुणे विद्यापीठाच्या अविष्कार या स्पर्धेतही विभाग स्तरावर सदर विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट सादर केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.