क्रिकेट खेळण्याचा बॉल प्रार्थना स्थळावर पडल्याच्या कारणावरून दगडफेक
नांदेड, दि. 27 - जुन्या नांदेड भागात क्रिकेट खेळण्याचा बॉल प्रार्थना स्थळावर पडल्यानंतर दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार काल सायंकाळी 6 वाजता घडला. नांदेडच्या जुन्या भागातील पाठकगल्ली परिसरात काही मुलं क्रिकेट खेळत होती. फलंदाजाने मारलेला चेंडू प्रार्थनास्थळावर जाऊन पडला आणि छोट्याशा प्रकारामुळे वाद घडला. या वादातून दोन गटांनी एक-दुस-यावर दगडफेक केली. दगडफेकीने दोन्ही गटातील लोक जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराविरूद्ध पोलिस ठाणे इतवारा येथे तक्रार देण्यासाठी आले होते पण प्रथम जखमी माणसांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
एका मैदानात मुले क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना एक बॉल एका इसमास लागला. त्यामुळे क्षणाधार्थ 100 ते 200 जणांचा जमाव तेथे धावून आला. तशातच एक बॅनर तेथे लावण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र होते. कदाचित जमावाच्या डोक्यात हाच राग असावा आणि त्यातून दगडफेक झाली. सुरेश मुत्तेपवार यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या घटनेत सुरेश मुत्तेपवार, पेंटाजी मुत्तेपवार, बबलु मुत्तेपवार असे तिघेजण जखमी झाले.
या घटनेचे वृत्त समजल्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी घटनास्थळास तातडीने भेट दिली. जखमींची विचारपूस केली. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख बाळु खोमणे, शहर प्रमुख पप्पु जाधव, नगरसेवक तुलजेश यादव, जम्मुसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी आजच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन पोलीस यंत्रणेला आजच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली.