गंगाप्रसाद काकडे यांना समाजरत्न पुरस्कार
नांदेड, दि. 27 - जिल्हा परिषद नांदेडच्या बळीरापमूर सर्कलचे काँग्रेस आय चे जि.प.सदस्य गंगाप्रसाद धोंडीबा काकडे यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल एकता सेवाभावी संस्था मुंबईच्यावतीने मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पुणे या सभागृहात त्यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात नांदेड जिल्हा परिषदेचे बळीरामपूर सर्कचे गंगाप्रसाद काकडे यांना समाजरत्न पुरस्कार पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स या सभागृहात शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानराज चौगुले, पंतप्रधानाचे सचिव किरण गिते, सौ.उषा गिते, प्रसिध्द सिनेअभिनीत्री निशा थोरात, समृती गव्हाणे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
