चेन्नईत रजनीकांत यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
चेन्नई, दि. 23 : अभिनेते रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी आज काही जणांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन केले. तामिळनाडूमधील एका संघटनने रजनीकांत यांच्या घराबाहेर त्यांचा प्रतीकात्मक पुतळाही जाळलाअसल्याचे सांगण्यात येत आहे. रजनीकांत यांनी राजकारणात येऊ नये असे आंदोलन करणा-यांकडून सांगण्यात येत आहे.
रजनीकांत हे कन्नड असल्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर राहावे, असे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्रमी तमीळ आहे. मागील 40 वर्षांपासून मी तामिळनाडूमध्ये राहत आहे, असे रजनीकांत यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली होती. मात्र कोणत्या पक्षात जाणार याबाबत अद्याप त्यांनी काहीही सांगितले नाही. यासंदर्भात रजनीकांत हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याची चर्चा केली जात होती.