Breaking News

टँकर घोटाळ्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कपिल मिश्रा यांना समन्स



नवी दिल्ली,दि. 23 : चारशे कोटी रुपयांच्या कथित टँकर घोटाळ्याच्या तपासासाठी दिल्लीचे माजीमंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या कपिल मिश्रा यांना लाचलूचपत विभागाकडून समन्स बजावण्यात आले आहे. आम्ही कपिल मिश्रा यांना सकाळी 11 वाजता बोलावले आहे, अशी माहिती विभागाचे प्रमुख मुकेश कुमार मीना यांनी सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे राजकीय सल्लागार विभव पटेल यांची चौकशी विभागाकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. या तपासादरम्यान पटेल यांनी आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे आम्ही मिश्रा यांना समन्स बजावण्यात आले आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. या टँकर घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यानंतर 11 मे रोजी मिश्रा यांनी आपले म्हणणे विभागासमोर मांडले होते.