Breaking News

माऊंट एव्हरेस्टवर बेपत्ता झालेल्या उत्तर प्रदेशमधील गिर्यारोहकाचा मृत्यू





काठमांडू, दि. 23 : माऊंट एव्हरेस्ट शिखरावर बेपत्ता झालेल्या उत्तर प्रदेशमधील गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविकुमार असे या भारतीय गिर्यारोहकाचे नाव असून शिखरावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृतदेह मुख्य मार्गापासून 200 मीटरखाली सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविकुमार हा माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर गेला होता. त्याने शिखर सरही केले होते. शिखर सर करुन परतत असताना रविकुमार बेपत्ता झाला होता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. मात्र आज त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे त्यांच्या गावी शोककळा पसरली आहे.