हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांचे निलंबन
हैदराबाद, दि. 30 - निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी कसोटीपटू आर्शद आयुब यांचे निलंबन केले. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी याच कारणावरून माजी सचिव के जॉन मनोज यांनाही निलंबित करण्याचा ठराव संमत करण्यात आला. हे दोघेही या सभेला गैरहजर होते.
आयुब आणि मनोज यां दोघांना निलंबित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच, या प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या नरेंद्र गौड, अदनान महबूब, पी यदगिरी आणि सूर्यप्रकाश या चौघांसह खानपानाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या संबंधी दोषींवर कठोर कारवाई करण्यातबाबत संघटनेला अधिकार देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असे संघटनेचे सचिव टी शेष नारायण यांनी सांगितले.