बॅलेन ड’ओर पुरस्कारासाठी रोनाल्डोलाच पसंती : नझारीओ
रिओ दी जानेरा, दि. 30 - फुटबॉल क्षेत्रातील सर्वोच्च बॅलेन ड’ओर पुरस्कारासाठी माझी पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीयानो रोनाल्डो यालाच पसंती आहे, असे मत ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डो नझारिओ डे लिमा याने व्यक्त केले. गेल्या काही वर्षात रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी यांच्यात या पुरस्करासाठी चुरस पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीदरम्यान तो बोलत होता.
यंदाच्या वर्षीच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी मला माझी रोनाल्डोच्या नावाला पसंती आहे. गेल्या दोन वर्षात त्याने केलेली कामगिरी आणि खेळातील सुधारणा उल्लेखनीय आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धांतील अनेक सामन्यांमध्ये तो महत्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने संघाला स्पर्धेचे विजेतेपदही मिळवून दिले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे नझारिओ म्हणाला.