आत्मपरीक्षण करून नव्याने सुरूवात करेन : कर्बर
पॅरिस, दि. 30 - मातीच्या मैदानावर सलामीच्या लढतीतील पराभवामुळे आता मला आत्मपरीक्षणाची गरज वाटत आहे. आत्मचिंतन केल्यानंतर मी नव्याने सुरूवात करेन, असे मत महिला टेनिसपटू अँजेलिक कर्बर हिने व्यक्त केले. काल झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बिगरमानांकित एकटेरिना माकारोव्हा हिने अव्वल मानांकित कर्बरला 6-2, 6-2 असे पराभूत केले. त्यामुळे तिला सलामीच्या सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला.
गेले वर्ष हे माझ्या कारकिर्दीतील चांगले वर्ष होते. दडपण कायमच असायचे. पण हे वर्ष थोडे वेगळे आहे. यंदा माझ्याकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. विशेषत: प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये माझी कामगिरी सर्वोत्तम व्हावी, असे सगळ्यांनाच वाटते. कारण मी काय करू शकते हे मलादेखील माहित आहे, असे कर्बर म्हणाली.
सध्या माझ्या आयुष्यातील खडतर आणि आव्हानात्मक काळ आहे. मला मातीच्या मैदानावर सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे माझी यंदाच्या हंगामातील मातीच्या मैदानावरील कामगिरी विसरून मला पुढे जायचे आहे, असेही कर्बरने स्पष्ट केले.