Breaking News

डॉ. रणजित पाटील यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी

अकोला, दि. 27 - कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृह,राज्यमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी आज या कामाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी रवीजी काळे कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन  पाटील, जलसंधारण विभागाचे श्री. मापारी, कारंजाचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, डॉ. राजीव काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
कापशी नदीचे 2 किलोमीटर पर्यंत रुंदीकरण व खोलीकरणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे 800 टीसीएम पाणीसाठा निर्माण होईल. नदीचे खोलीकरण व  रुंदीकरण झाल्याने आजूबाजूच्या शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. तसेच पुराचा धोकाही कमी होईल, अशी माहिती जलसंधारणचे श्री. मापारी यांनी यावेळी दिली.