डॉ दिलीप पवार यांना मसापचा शरदचंद्र भालेराव पुरस्कार प्रदान
नाशिक, दि. 31 - केटीएचएम महाविद्यालयातील मराठी विभागपॉ. दिलीप पवार यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या साहित्य संस्थेद्वारा सामाजिक आशयाच्या ग्रंथलेखनासाठी (2016) दिला जाणारा मानाचा शरदचंद्र भालेराव स्मृती पुरस्कार संस्थेच्या 111 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिध्द कन्नड लेखिका वैदेही (जानकी श्रीनिवास मूर्ती ) यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे होते. प्रमुख अतिथी म्हणून उल्हासदादा पवार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी , प्रकाश पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुगावा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या डॉ पवार यांच्या ’ कामगार कवितेतील सामाजिक जाणिवा ’ या समीक्षा ग्रंथाला लाभलेल्या पुरस्काराचे सन्मानरोख रक्कम व पुष्पगुच्छ असे स्वरूप होते. प्रकाशवाटेवरचा अथक प्रवासी ’ हा काव्यसंग्रह प्रसिध्द असलेल्या डॉ. पवार यांनी या ग्रंथातुन मराठी कामगार कवितेच्या प्रेरणा , स्वरूप ,वैशिष्ट्ये या मांडणीबरोबरच पाश्चात्य व भारतीय विचारवंतांचे लाभलेले तात्विक अधिष्ठान शोधण्याचा मुलगामी व वास्तव प्रयत्न केलेला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील जेष्ठ समीक्षक डॉ नागनाथ कोत्तापल्ले , डॉ.द ता भोसले , डॉ रणधीर शिंदे , डॉ केशव देशमुख , कामगार नेत्या मुक्ता मनोहर आदींनी यापुर्वीच या ग्रंथाची बलस्थाने विशद करून त्यास पुरस्कृत केले आहे. साहित्यात दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची मसापने उचित दखल घेऊन पुरस्कृत केल्याबद्दल मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार , अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे , सभापती अॅड नितीन ठाकरे ,उपसभापती नानाजी दळवी, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले ,संचालक मंडळ , के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड , शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे , प्रा एस के शिंदे , डॉ आर डी दरेकर , सी डी शिंदे ,प्राध्यापक वृंद , साहित्य जगतातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.