हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला करणार्यास हरियाणातून अटक
पुणे, दि. 22 - हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला करुन लूटणार्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. देवराज भुकदेव सिंग(22,रा.सहानपुर रोड, हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, सिंग हा सहा महिन्यापासून कात्रज येथील शिवम हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता. हॉटेल मालक देवेंद्र दत्तात्रय तांबे यांनी त्याचे पगाराचे पूर्ण पैसे दिले नव्हते. यामुळे त्याने 23 मार्च 2017 रोजी रात्री दिड नंतर सर्व कामगार काम संपवून खोलीवर गेल्यावर मालकाला काऊंटरपाशी गाठले. तेथे मालक एकटा असल्याचे पाहुण त्याने बांबूने अचानकपणे त्यांच्या डोक्यावर चार ते पाच घाव घातले. ते जखमी होऊन बेशुध्द पडल्यावर त्यांचे दोन मोबाईल हॅण्डसेट, एक धनादेश, बँकेचे एटीएम कार्ड आणि रोख पाच हजार रुपये घेऊन पळ काढला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने तपास करता, आरोपी मागील एक महिन्यापासून हरिव्दार येथे असल्याचे मोबाईल टॉवरच्या लोकेशनवरुन कळले. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने सलग दहा दिवस हरिव्दार येथे आरोपीचा माग काढला. सरते शेवटी तो गुरुनानक हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून सिंगला अटक करण्यात आले.