धरणगावात शेतकरी संघर्ष मोर्चाद्वारे देवकरांचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा
जळगाव, दि. 22 - धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतक-यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ’शेतकरी संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चात हजारो शेतकरी दरम्यान, रणरणत्या उन्हात शेतकरी संघर्ष मोर्च्यात शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. भाजपा-शिवसेना सरकार शेतक-यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले रमेश माणिक पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील हे सत्तेत नसताना शेतक-यांसाठी शिंगाडा मोर्चा काढत होते. आता सत्तेत आल्यावर, मंत्रीपद मिळाल्यावर गप्प का झाले? असा सवाल उपस्थित करीत मतदार संघात अवैध धंद्यांच्या जीवावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार संघातील सट्टा, पत्ता, दारू हे अवैध धंदे 15 दिवसात बंद न झाल्यास त्यांना मतदार संघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सहभागी झाले होते. धरणगावात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात शेतकर्यांनी सहभाग घेतल्याने धरणगाव शहर चांगलेच दणाणले होते. दरम्यान, तहसीलदार प्रशांत बोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील बालाजी मंदिरापासून मोर्चाची सुरुवात झाली होती. गावातील प्रमूख मार्गावरून उड्डाणपुलामार्गे तहसील कार्यालयात हा मोर्चा पोहचला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दारू, सट्टा, पत्ता अशा अवैध धंद्यांना जोपासून पिढी बरबाद केल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला. यावेळी गफ्फार मलिक, विलास पाटील, रमेश माणिक पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजपा सेना सरकारवर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले.