Breaking News

एकतेची भावना हेच देशाचे शक्तिस्थान - मुक्ता टिळक

पुणे, दि. 22 - भारत देश हा विविधतेने नटलेला असून भारतीय म्हणून या विविधेतही एकतेची भावना देशाच्या नागरिकांमधे आहे. ही एकतेची भावना हेच देशाचे  शक्तिस्थान आहे. एकतेची भावना रुजविण्यामधे कला आणि संस्कृती यांचा वाटा मोलाचा आहे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी व्यक्त केले. 
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने आयोजित ‘हार्मनी-2017ङ्क या 13व्या राश्ट्रीय पातळीवरील बहुभाशिक नृत्य, नाटय, संगीत महोत्सवाचे उद्घाटन टिळक  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम प्रमुख रवींद्र खासनीस, सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, कार्याध्यक्ष श्याम भुर्के सचिव  हेमंत वाघ, मुकुंद नगरकर आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाल्या की, सध्याच्या वेगवान जीवनपध्दतीमधे विषेशतः शहरी नागरिक आपापल्या मर्यादित कोशामध्ये अडकलेले आहेत. त्यांना स्वतः आणि स्वतःचे कुटुंब  यांच्या पलिकडे पहाण्यास वेळ नाही. मात्र, या कोशाबाहेर पडून देशाच्या अन्य प्रांतातील संस्कृती आणि जीवनषैली यांची ओळख करुन घेणे, हे भारतासारख्या  वैविध्यपूर्ण देशाचे नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. कलेच्या माध्यमातून अषी सांस्कृतिक देवाणघेवाण होणे सुलभ जाणार आहे. हार्मनी सारख्या  उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्याबरोबरच होणारी सांस्कृतिक देवाण-घेवाण हे कार्य उल्लेखनीय आहे, असेही त्या  म्हणाल्या.
नृत्य,नाटय,संगीत हे वेगवेगळे कला प्रकार असले तरीही भावनाचे उत्कट प्रकटीकरण हे समान उदिदश्ट त्यामागे आहे. कला ही ईष्वराची साधना आहे. ईष्वराच्या  जवळ जाण्याचे साधन आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात कलेबद्दल प्रेम आणि जाण आहे, असे खासनीस यांनी यावेळी नमूद केले.  सलग एक महिना चालणाया या  स्पर्धात्मक महोत्सवात 21 राज्यातून आलेले आठ हजार कलाकार 2 हजार 200 कार्यक्रम सादर करणार आहेत, अषी माहिती प्रा. भुर्के यांनी प्रास्ताविकात दिली.  संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत वाघ यांनी आभार मानले.