Breaking News

वैष्णवदेवी यात्रेच्या मार्गातील जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण

कटरा, दि. 29 - वैष्णवदेवी यात्रेच्या मार्गातील हिमकोटी क्षेत्रातील जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले हे. काल (27 मे)  रात्री उशीरा हिमकोटीच्या जंगलात एक किलोमीटरपर्यंत आग पसरली होती. वैष्णदेवी यात्रेसाठी तयार करण्यात नव्या मार्गाच्या 300 मीटर अंतरापर्यंत ही आग  पोहोचली होती. याकारणास्तव यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी देवस्थान मंडळाने नवा मार्ग बंद केला होता. मात्र, जुना मार्ग वाहतुकीसाठी सुरु ठेवला आहे.
आगीची माहिती मिळताच देवस्थान मंडळाने कटरामधील नोंदणीकरण केंद्र रात्री 9 वाजताच बंद केले. नोंदणी केंद्र बंद होईपर्यंत 41 हजार यात्रेकरुन वैष्णवदेवीच्या  दर्शनासाठी रवाना झाले होते.