अमरावतीत 4 नवजात बालकांचा मृत्यू
अमरावती, दि. 30 - अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चारही नवजात बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संबंधीत प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील एक पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे.