जाधव यांना तातडीने फाशी देण्याची याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
इस्लामाबाद, दि. 30 - कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका पाकिस्तानचे माजी कायदामंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाचे नेते फारुक.एच. नाईक यांनी दाखल केली होती.
कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरविले असून जाधव यांनी निर्णयाविरुद्ध कोणताही अपील केलेला नाही,त्यामुळे त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी असे दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. याचिकाकर्त्यांच्या मते, पाकिस्तानच्या कायद्याआधारे पाकिस्तानचे न्यायालय या प्रकरणी निर्णय देऊ शकतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण प्रकरणी अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताची बाजू घेतली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे जाधव प्रकरणी कोणताही बदल झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.