जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलपतीपदी नजमा हेपतुल्ला
नवी दिल्ली, दि. 30 - मणिपूरच्या राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांची जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल एम.ए. जाकी यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. त्या जागी हेपतुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील पाच वर्षे त्या या पदी रहातील.
हेपतुल्ला यांच्या नियुक्तीने विद्यापीठाला खूप फायदा होईल आणि त्यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनातील अनुभवांतून खूप काही शिकता येईल, असे विद्यापीठाचे उपकुलगुरु तलत अहमद यांनी म्हटले आहे. हेपतुल्ला या 1986 ते 2012 या काळात पाच वेळा राज्यसभेच्या खासदार होत्या. याशिवाय 16 वर्षे राज्यसभेच्या उपसभापती राहिल्या आहेत. 2016 मध्ये त्यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्या आधी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रीही होत्या.