Breaking News

पेटीएमची पेमेंट बँक लॉन्च, खात्यावरील रकमेवर 4 टक्के व्याज

नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान मोदींच्या कॅशलेस इंडियाच्या नार्‍यानंतर संपूर्ण देशात आपले पाय घट्ट रोवणार्‍या पेटीएमने काल आपली पेमेंट बँक लॉन्च केली आहे.  कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करुन याची माहीती दिली. या नव्या सेवेत पेमेंट बँकेतील जमा रकमेवर खातेदारांना 4 टक्के व्याज मिळणार आहे.
रिझर्व बँकेकडून पेटीएमला पेमेंट बँकेचा परवाना नुकता मिळाला असून, यानुसार पेटीएमने ही नवी सेवा सुरु केली. या बँकिंग सेवेच्या माध्यमातून कंपनी 31 ब्रांच  आणि 3000 कस्टमर पाईंट सुरु करणार आहे. पेटीएमने ही सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली असून, याचा वापर कंपनीचे कर्मचारी आणि काही निवडक  व्यक्तींनाच याचा वापर करता येणार आहे. जर पेटीएम यूजर्सना ही सेवा वापरायची असल्यास, त्यांना त्यांच्या पेटीएमवरुन इनव्हीटेशन रिक्वेस्ट पाठवावी लागेल.