Breaking News

नितीन तोमर प्रो कबड्डी लीगचा सर्वात महागडा खेळाडू!

मुंबई, दि. 24 - प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाच्या लिलावात 22 वर्षीय नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आगामी मोसमासाठी नवखा संघ  असलेल्या टीम यूपीने त्याला 93 लाखांमध्ये खरेदी केलं. पीकेएलच्या यंदाच्या मोसमात 12 संघ आहेत. पाचव्या मोसमात हरियाणा, यूपी, अहमदाबाद आणि  तामिळनाडू या चार नव्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. व्हीवो या लीगचा टायटल स्पॉन्सर असून या लीगला पुढील पाच वर्षांसाठी 300 कोटी रुपये देणार  आहे.
लिलावाच्या सुरुवातीला मनजीत चिल्लर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. जयपूर पिंक पँथर्सने त्याला 75.5 लाखंमध्ये खरेदी केलं. पण लिलावाच्या अखेरच्या  टप्प्यात जेव्हा रेडरसाठी लिलाव सुरु झाला, तेव्हा नितीन तोमरने सर्व रेकॉर्ड मोडले आणि मनजीत चिल्लरला धोबीपछाड जेत सर्वात महागडा खेळाडू बनला. यानंतर  रोहित कुमारनेही मनजीतला मागेल टाकलं. बंगळुरु बुल्सने 83 लाखांमध्ये आपल्या संघात सामील केलं. के सेल्वामणीही मनजीतजवळ पोहोचला होता. पण जयपूरने  त्याच्या 73 लाखांची अंतिम बोली लागली.
पहिल्या टप्प्यात परदेश खेळाडूंमध्ये इराणचा अबाजार मोहाजेरमिघानी सर्वात महागडा खेळाडू ठरला. इराणच्या या डिफेंडरला, प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सीझनमध्ये  नव्याने दाखल झालेल्या गुजरातच्या संघाने 50 लाखांमध्ये विकत घेतलं. खेळाडूंना 20 लाख रुपयांपासून 93 लाख रुपयांपर्यंतची बोली लागली. अष्टपैलू श्रेणीमध्ये  मनजीत चिल्लरनंतर राजेश नरवाल सर्वात महागडा खेळाडू ठरला. यूपी टीमने 69 लाख रुपये मोजून राजेश नरवालला आपल्या संघात समाविष्ट केलं.
डिफेंडर खेळाडूंमध्ये सूरजीत सिंहला बंगालच्या संघाने 73 लाखांमध्ये आपल्या संघात सामील केलं. तर जीव कुमार 52 लाखंसह दुसरा सर्वात महागडा डिफेंडर  बनला. यूपी संघाने त्याच्यावर यशस्वी बोली लावली. रेडरमध्ये नितीन तोमर सर्वात महागडा खेळाडू बनला. तर या श्रेणीत रोहित कुमार 81 लाख रुपयांसह दुसर्‍या  स्थानावर राहिला. यंदाच्या मोसमात रोहित कुमार बंगळुरु टीमचं प्रतिनिधित्त्व करेल.
दुसरीकडे शब्बीर बापूची घरवापसी झाली आहे. यू मुंबाने 45 लाखांत शब्बीर बापूला पुन्हा संघात सामील करुन घेतलं.  तर अनुप कुमारच्या जोडीला काशीलिंग  अडके आणि नितीन मदने हे दोन मराठमोळे शिलेदार असतील. याशिवाय मुंबईच्या रिषांक देवाडिगाला टीम उत्तरप्रदेशने 45.50 लाखात खरेदी केलं आहे. दिल्लीचे  तख्त राखायला खंदे मराठमोळे वीर मैदानात उतरले आहे. निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत.