Breaking News

’जेम्स बाँड’ अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन

झुरिच, दि. 24 - स्वित्झर्लंड : जेम्स बाँड साकारणार्‍या कलाकारांपैकी अनेक चाहत्यांचे लाडके असलेले हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झालं. वयाच्या  89 व्या वर्षी कर्करोगाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. कर्करोगाशी दिलेल्या अत्यल्प आणि शूर लढ्यानंतर रॉजर मूर कालवश झाले, असं मूर कुटुंबीयांनी  ट्विटरवर जाहीर केलं. ‘आम्ही हादरलो आहोत’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मूर यांनी स्वित्झर्लंडमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. मोनॅको शहरात त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.