Breaking News

पुस्तकांच्या गावाला देणार ठाणेकर भरघोस पुस्तकांची देणगी

ठाणे, दि. 27 - स्ट्रॉबेरीसाठी पसिद्ध असलेलं महाबळेश्‍वरजवळील भिलार हे गाव शिक्षणमंत्री विनाद तावडे यांच्या संकल्पनेतून आणि पेरणेने नुकतंच जगाच्या  नकाशावर भारतातील पहिलं पुस्तकांचं गांव म्हणून उदयास आले. महाराष्ट्रातील रसिक वाचक या पकल्पाचे भरभरून स्वागत करीत आहेत. या महत्त्वाकांक्षी  पकल्पामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी ठाणेकर रसिक वाचक सरसावले आहेत. निमित्त आहे येथील व्यास किएशन्स् आणि वंदे मातरम् संघ, ठाणे  आयोजित पुस्तक आदान- पदान महोत्सव. वाचन पचार-पसार व्हावा म्हणून आपल्याजवळचे पुस्तक देऊन दुसरे पुस्तक घेऊन जावे ही या महोत्सवाची संकल्पना  आहे. या महोत्सवात रसिक ग्रंथपेमींनी दिलेली हजारो पुस्तके यभिलारङ्क येथील पहिल्या पुस्तकांच्या गावाला समस्त ठाणेकरांच्यावतीने लोकार्पण करण्यात येतील,  अशी माहिती व्यास किएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी दिली. 
येत्या रविवार, 28 मे आणि सोमवार, 29 मे रोजी सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, ठाणे येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 1  आणि सायंकाळी 5 ते 9 यावेळेत रसिक पुस्तक आदान-पदानाचा लाभ घेऊ शकतात. उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले  जात आहे. वाचकांनी आपल्याकडील कोणतेही पुस्तक घेऊन यायचे आणि त्या बदल्यात दुसरे कोणतेही पुस्तक घेऊन जायचे, अशी ही योजना आहे. एकाहून अधिक  कितीही पुस्तके वाचक बदली करू शकतात. तसेच आपल्याजवळील पुस्तके देणगीस्वरुपातही या योजनअंतर्गत भेट म्हणून देऊ शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजी  भाषेतील पुस्तके, नियतकालिके, मासिके, बाल साहित्य यांचा यात समावेश असेल. नियम आणि अटी व्यास किएशन्स्कडे राखून ठेवण्यात येतील. संपूर्ण महोत्सव  विनामूल्य आहे.
ठाण्यातील लेखक, सहित्यिक, कलाकार, पत्रकार, समीक्षक, रसिक, वाचक तसेच वाङ्मयीन संस्था व अवघे ठाणेकर आपली बहुमोल पुस्तके पहिल्या पुस्तकाच्या  गावाला भेट देण्यासाठी सरसावले असून दोन दिवसाच्या पुस्तकांच्या देवाण-घेवाण महोत्सवाला उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती वंदे  मातरम् संघाचे अध्यक्ष ऍड. संदीप लेले यांनी दिली आहे.
दोन दिवस चालणाऱया या महोत्सवात पुस्तक आदान-पदानाखेरीज साहित्यिक कार्यकमही आयोजित केले आहे. रविवार, 28 मे रोजी सकाळी 10 वा. महोत्सवाचे  उद्घाटन ज्येष्ठ अभ्यासक ग्रंथसखा श्याम जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वरसंवादिनी  पस्तुत पुष्पा लेले आणि सहकारी गीत सावरकर हा कार्यकम सादर करतील . सोमवार, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता व्यास किएशन्स् पकाशित आणि  रामदास खरे लिखित कॅलिडोस्कोप या पुस्तकाचे पकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंतराव देशमुख आणि कवीवर्य अरुण म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे.
ठाणेकर रसिकांनी या साहित्य महोत्सवास आणि पुस्तक आदानपदान महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्यास किएशन्स्चे मार्गदर्शक श्री. वा.  नेर्लेकर आणि वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष ऍड. संदीप लेले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व्यास किएशन्स्च्या कार्यालयात किंवा 022-25447038 या  कमांकावर संपर्प साधावा.