Breaking News

भालगांव येथे अशुध्द पाण्याने 30 जणांना डायरीयाची लागण

बुलडाणा, दि. 21 - तालुक्यातील भालगांव येथे अशुध्य पाणी पिल्यामुळे डायरीयाची लागण झालेल्या 25 ते 30 रूग्णांना चिखली ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच चिखली तालुका युवक कॉगे्रसचे अध्यक्ष रमेश सुरडकर व शहर अध्यक्ष अतरोद्यीन काझी व युवक कॉगे्रसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची ग्रामीण रूग्णालयात जावून भेट घेतली. 
.यावेळी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची ग्रामीण रूग्णालय प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येवून त्यांचेवर चांगले उपचार व्हावेत यासाठी चौकशी करता अनेक रूग्णांना उपचाराची गरज दिसून आली. त्यावर सदर रूग्णालयात कोणीही जबाबदार वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने युवक कॉेगे्रसच्या पदाधिकार्‍यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांना बोलावून घेतले. व या रूग्णांवर योग्य तो उपचार करण्याचे त्यांना सुचविले. त्यांनीही युवक कॉगे्रस कॉग्रेस पदाधिकार्‍यांच्या सुचनेनंतर तातडीने उपाय योजना करत उपचार प्रारंभ केले. ग्रामीण रूग्णालयास भेट देणार्‍या मध्ये वरील पदाधिकार्‍यांसोबत भास्कर काकडे, संजय गिरी, राजु सोळंकी, संजय सोळंकी, किशोर साळवे, बालु साळोख, गणेश परीहार, अनिल जंवजाळ, ज्ञानेश्‍वर सोळंकी, पप्पु देशमुख, राजु सुरडकर, राजु सावंत, तुकाराम परीहार, यांचा समावेश होता.